मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट

नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

Updated: May 19, 2016, 06:58 PM IST
मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट title=

मुंबई: नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. 'मै इंदू' असं या चित्रपटाचं नाव आहे. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 21 महिन्यांमध्ये देशात आणीबाणी लावण्यात आली होती. त्यावर आधारित हा चित्रपट आहे. 

या काळामध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात आलं, माध्यमांचीही गळचेपी करण्यात आली होती, तसंच संजय गांधींच्या आदेशानंतर जबरदस्तीनं नागरिकांची नसबंदी करण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले होते. 

या आधी गुलजार यांचा आंधी हा चित्रपट आणीबाणीवरच होता. यामध्ये सुचित्रा सेन यांनी केलेली भूमिका इंदिरा गांधींच्या जवळची होती. तर अमृत नहाता यांचा किस्सा कुर्सी का हा चित्रपटही आणीबाणीवरच आधारित होता, यामध्ये शबाना आजमी प्रमुख भूमिकेमध्ये होत्या. 

हा चित्रपट बनवण्यासाठी मधुर भांडारकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. तसंच आणीबाणीच्या काळातल्या पत्रकार, लेखक आणि जेलमध्ये गेलेल्यांबरोबरही मधुरनं चर्चा केल्याचं बोललं जात आहे.