पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया'वर शाहरुख फिदा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजनेवर फिदा झाला आहे.

Updated: Apr 28, 2016, 08:29 PM IST
पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया'वर शाहरुख फिदा title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजनेवर फिदा झाला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वकांक्षी योजनेमुळे देशामध्ये रोजगार निर्माण होत आहे, असं शाहरुख म्हणाला आहे. 

मेक इन इंडियामुळे परदेशातल्या कंपन्या भारतात येऊन आपली उत्पादनं बनवतील, यामुळे रोजगार निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया किंग खाननं दिली आहे. 

भाजप नेत्या शायना एनसी यांच्या मेक इन इंडियावर आधारित मूव्हर्स अॅण्ड शेकर्स या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी शाहरुखनं मेक इन इंडियाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली.