'बॉलिवूडची मुन्नी' अर्जुन कपूरसोबत 'बदनाम'?

बॉलिवूडमध्ये सध्या खमंग चर्चा सुरू आहे एका खास लव्ह अफेअरची... ‘बॉलिवूडची मुन्नी’ मलाईका अरोरा खान ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला ‘डेट’ करत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.   

Updated: Jul 12, 2014, 12:13 PM IST
'बॉलिवूडची मुन्नी' अर्जुन कपूरसोबत 'बदनाम'? title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या खमंग चर्चा सुरू आहे एका खास लव्ह अफेअरची... ‘बॉलिवूडची मुन्नी’ मलाईका अरोरा खान ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला ‘डेट’ करत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.   

नवोदित अभिनेता आणि प्रोड्युसर बोनी कपूर यांचा (पहिल्या लग्नापासून) मुलगा अर्जुन कपूर आणि सलमान खानची वहिनी, अरबाज खानची पत्नी मलाईका अरोडा खान हिच्यासोबत संबंधात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.  

मीडिया वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, मलाईका अरोरा आपल्या लग्नाच्या बेडीला आता कंटाळलीय... आणि तिला अर्जुन कपूर हा आता अरबाजपेक्षा जास्त जवळचा वाटतोय... अरबाज मात्र आपल्या वैवाहिक जीवनात सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. 

अर्जुन कपूर हा या अगोदर सलमानची छोटी बहिण अर्पिता हिच्यासोबत संबंधात होता... पण, आता त्याचं चक्क सलमानच्या वहिणीबरोबरच सूत जुळलंय.   

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मलाईकाला तिच्या आणि अर्जुनच्या संबंधाबाबत विचारलं गेलं... तर तिनं प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही, असं म्हणत हा विषय टाळला. मलाईका ही अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.