'बाजीराव मस्तानी'तलं मल्हारी साँग रिलीज

'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं ऑफिशियल गाणं मल्हारी रिलीज झालं आहे. मल्हारी हे गाणं नुकतंच यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Updated: Nov 30, 2015, 04:40 PM IST
'बाजीराव मस्तानी'तलं मल्हारी साँग रिलीज title=

मुंबई : 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं ऑफिशियल गाणं मल्हारी रिलीज झालं आहे. मल्हारी हे गाणं नुकतंच यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

'देखो दुश्मनची कशी वाट लावली' असे या गाण्याचे बोल आहेत, मात्र या गाण्याच्या तालावर रणवीर सिंह ज्या प्रकारे ठेका धरतो, यावरून रणवीर सिंह या शूरवीर बाजीरावाचं पात्र असल्याचं वाटत नाही.

बाजीराव पेशवे असा ठेका धरतात, हे प्रेक्षकांना सहन होणार आहे का?, असा देखील प्रश्न पडतो, 'पाहा कशी वाट लावली?' विशाल ददलानी यांनी हे गाणं गायलंय, तर संजय लीला भन्साली यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यातील संगीत अॅटम साँग सारखं वाटतं, कोंबडी पळाली सारख्या गाण्याची तुम्हाला आठवण होऊ शकते, पाहा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.