मुंबई: अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हणते, तिचा आगामी चित्रपट 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत हॉट सीन करायला पहिले संकोचली होती. मात्र पुरी यांनी खूप सहजतेने ते दृश्य चित्रित केले.
मल्लिकानं सांगितलं, 'चित्रपटात ओम पुरी आणि माझ्या भूमिकेदरम्यान काही बेडरूम सिन्स आहेत. ते खूप ज्येष्ठ कलाकार आहेत म्हणून त्यांच्यासोबती ही दृश्य चित्रित करण्यासाठी मला संकोच वाटत होता. मात्र त्यांनी अतिशय व्यावसायिक पद्धतीनं आणि सहजतेनं ते पूर्ण केले.'
चित्रपटाचे दिग्दर्शक के.सी.बोकाडिया आहेत. 'ख्वाहिश' आणि 'मर्डर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली मल्लिका म्हणते की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिला खूप संघर्ष करावा लागला, कारण तिचा कुणी गॉडफादर नव्हता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.