अभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड

मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे. 

Updated: Sep 23, 2015, 05:18 PM IST
अभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड title=

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे. 

चैतन्य ताम्हणे या तरुण दिग्दर्शकानं 'कोर्ट' हा चित्रपट बनवलाय. आरोपी, दोन्ही पक्षाचे वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टीकोनातून आपल्या भारतीय कायदेपद्धतीवर या चित्रपटात भाष्य करण्यात आलंय. 

आणखी वाचा - फिल्म रिव्ह्यू: आजच्या न्यायालयीन व्यवस्थेचं वास्तववादी चित्र 'कोर्ट'

प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर हे भारतातून ऑस्करसाठीच्या निवड समितीचे ज्युरी आहेत. देशातील विविध भाषांमधील ३० चित्रपटांमधून 'कोर्ट'ची निवड करण्यात आलीय. 

 

Marathi Film 'Court' is the official entry from India for Oscars Award. Proud to be one of the jury member to have backed the film!!!

Posted by Ravi Jadhav on Wednesday, September 23, 2015

या स्पर्धेत पीके, मसान, मेरी कोम, हैदर हे हिंदी, तर काक्का मुट्टी आणि बाहुबली सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांचा समावेश होता. निवड समितीत असलेल्या दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुकवरून याची माहिती दिलीय. कोर्ट चित्रपटाला याचवर्षी मानाचं सुवर्णकमळ मिळालंय. 

आणखी वाचा - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.