'क्लासमेटस्'ची पहिल्याच आठवड्यात रग्गड कमाई!

 सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला स्पष्ट पाहायला मिळतोय. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'क्लासमेटस्' या मराठमोळ्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात तब्बल ६ कोटींची कमाई केलीय. 

Updated: Jan 23, 2015, 08:48 PM IST
'क्लासमेटस्'ची पहिल्याच आठवड्यात रग्गड कमाई!  title=

मुंबई :  सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला स्पष्ट पाहायला मिळतोय. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'क्लासमेटस्' या मराठमोळ्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात तब्बल ६ कोटींची कमाई केलीय. 

अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'क्लासमेटस्' या मराठी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. 

पहिल्याच आठवड्यातल्या या कमाईमुळे 'क्लासमेट'नं  याआधी हीट ठरलेल्या 'दुनियादारी' या सिनेमालाही मागे टाकलंय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.