मिथिला आणि अमेय... एकमेकांचे व्हॅलेंटाईन!

'दिल दोस्ती दोबारा'फेम अमेय वाघ आणि 'कप साँग'फेम मिथिला पालकर सध्या मराठी वर्तुळातलं चर्चेतलं जोडपं बनलंय. 

Updated: Feb 18, 2017, 04:56 PM IST
मिथिला आणि अमेय... एकमेकांचे व्हॅलेंटाईन! title=

मुंबई : 'दिल दोस्ती दोबारा'फेम अमेय वाघ आणि 'कप साँग'फेम मिथिला पालकर सध्या मराठी वर्तुळातलं चर्चेतलं जोडपं बनलंय. 

होय, या दोघांनी आपलं नातं सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर त्यांच्यासाठी अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पडला. 

'भारतीय डिजिटल पार्टी' अर्थात भाडीपाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले... आणि नुकतंच व्हॅलेटाईन डेच्या निमित्तानं त्यांनी आपला 'व्हॅलेंटाईन' जाहीर केला. 

'कप साँग'च्या आपल्या अनोख्या टॅलेंटमुळे मिथिला पहिल्यांदा समोर आली... त्यानंतर 'महाराष्ट्र देशा' या व्हिडिओ साँगमधून ती सोशल मीडियातली एक तरुण आयकॉन ठरली... अर्थात अमेयही अनेक नाटकांमधून आणि युथफूल सिरियल्समधून प्रेक्षकांना आपल्या अभिनयानं वेड लावतोय. 

अर्थात, या दोघांना एकत्र पाहून यामुळे नक्कीच हजारो तरुण-तरुणींचं हृदयाची तार मात्र तुटली असेल हे नक्की...