'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'

माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

Updated: Jun 25, 2014, 06:32 PM IST
'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय' title=

मुंबई : माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल विविध कथा-कहाण्या ऐकून रणबीर हैराण झालाय. मुंबईमध्ये एका माइस्ट्रो कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला 32 वर्षीय रणबीर कपूर आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत होता.

‘मी माझ्या आई-वडिलांना सोडून एकटाच राहतोय... माझ्या वडिलांनी मला घराबाहेर हाकललंय... आणि अशाच माझ्याचविषयीच्या अनेक कथा मला ऐकायला मिळतायत... त्यामुळे खरं तर मला खूप वाईट वाटतंय की माझं वैयक्तिक जीवनच एक रिअॅलिटी शो बनलाय’ असं यावेळी रणबीरनं म्हटलंय.

आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल उडणाऱ्या अनेक अफवांनी आपल्या वैयक्तिक जीवनाला एका रिअॅलिटी शो बनवून ठेवलंय, याबद्दल त्यानं नाराजी व्यक्त केलीय... याच सगळ्या चर्चांमुळे आई-वडिलांना मान खाली घालावी लागतेय, म्हणून मला वाईट वाटतंय.

अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांचा मुलगा असलेला हा स्टार मुलगा त्याच्या आईवडिलांसाठी काळजीत आहेत. माझे आई-वडिल आता उतरत्या वयात आहेत आणि त्यांना लाज वाटावी, अशा माझ्याबद्दलच्या गोष्टी त्यांनी वाचाव्या लागू नयेत, असं मला वाटतंय.

रणबीर आपल्या आई-वडिलांचं घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहे, अशा प्रकारच्या अफवांना पेव फुटलं होतं... यावर रणबीरनं, मी ज्या घरात राहतो त्याचं काम सुरू आहे आणि अशा परिस्थितीत कुणीही अशा घरात राहत असतील त्यांना घर रिकामं करावं लागतं, असं स्पष्टीकरणं दिलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.