नागराज लवकरच या मराठी सिनेमात झळकणार

मराठीतला हा 'द सायलेन्स' हा सिनेमा पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2017, 02:01 PM IST

मुंबई : सैराट नंतर महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला युवा दिग्दर्शक नागराज मंजुळे काय करतोय, तो नवा सिनेमा कधी आणि कोणता घेऊन येणार आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे.

नागराज सैराटनंतर मराठीत कोणता सिनेमा घेऊन येत आहे, या प्रश्नाची उत्सुकता संपण्याआधी नागराजने एका मराठी सिनेमात भूमिका साकारली आहे. 

मराठीतला हा 'द सायलेन्स' हा सिनेमा पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. निळकंठ मास्तर सिनेमानंतर गजेंद्र अहिरे हे  'द सायलेन्स' हा मराठी सिनेमा घेऊन येत आहेत.