नसीरुद्दीन शाहंना आवडत नाही शाहरुखचा अभिनय

मला शाहरुख खानचा अभिनय फारसा आवडत नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

Updated: Jun 9, 2016, 03:50 PM IST
नसीरुद्दीन शाहंना आवडत नाही शाहरुखचा अभिनय title=

मुंबई : मला शाहरुख खानचा अभिनय फारसा आवडत नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे. अक्षय कुमार हा उत्तम अभिनेता आहे, शाहरुखचा अभिनय मला जास्त पसंद नाही, पण त्यानं जे काही कमावलं आहे आणि स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्याच कौतुक करावं लागेल, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. 

अक्षय कुमार बरोबरच शाह यांनी नवाजुद्दिन सिद्दीकी, मनोज वाजपेयी, अरशद वारसी यांचीही स्तुती केली आहे, तसंच आमिर खानचंही कौतुक केलं आहे. 

नसीरुद्दीन शाह आणि काल्की यांचा अभिनय असलेल्या वेटिंग या चित्रपटाची समीक्षकांनी स्तुती केली आहे. या चित्रपटानंतर नसीरुद्दीन शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.