सैराटच्या रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अर्चीची कौतुकास्पद कामगिरी

Updated: May 6, 2016, 07:04 PM IST
सैराटच्या रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान  title=

मुंबई : नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. कोणतही अभिनयाचं शिक्षण नसणाऱ्या किंवा पाठबळ नसलेल्या अर्चीने सिनेमात कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

व्हिडिओ पाहा फोटोच्या खाली

रिंकू राजगुरुच्या याच सैराट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. अतिशय कमी वयात रिंकूने मिळवलेलं हे यश खूपच मोठं आहे. 

या कार्यक्रमात अनेक दिग्गजांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरुण जेठली, महानायक अमिताभ बच्चन आणि त्याचं संपूर्ण कुंटुंब देखील उपस्थित होतं. शिवाय कंगणा रानावत, रेमो, गायक महेश काळे, संजय लीला भन्साळी, रमेश सिपी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

पाहा व्हिडिओ