२३ व्या वर्षी अशोक चक्र मिळविणारी नीरजा साकारतेय सोनम

मुंबईत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या मुलीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. या नीरजाने एमर्जन्सी डोअर उघ़डून अतिरेक्यांच्या तावडीतून ३५९ प्रवाशांना वाचवण्याचं साहस दाखवलं,  अतिरेक्यांनी लहान मुलांवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली, त्यावेळी नीरजाने आपल्या अंगावर गोळ्या घेत वीरमरण पत्करलं होतं. 

Updated: Dec 17, 2015, 10:10 PM IST
२३ व्या वर्षी अशोक चक्र मिळविणारी नीरजा साकारतेय सोनम  title=

मुंबई : नीरजा हा सिनेमा २३ व्या वर्षी अशोक चक्र मिळवणाऱ्या शूरवीर मुलीच्या सत्य कहाणीवर आधारीत आहे. मुंबईत एअर होस्टेस म्हणून नीरजा काम करत होती. 

(नीरजा सिनेमाचा थरारक व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

हायजॅक झालेल्या विमानाचत नीरजाच्या डोक्याला अतिरेक्यांनी पिस्तुल लावलं,  तरीही नीरजाने एमर्जन्सी डोअर उघ़डण्याचं साहस दाखवलं, आणि ३५९ प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. एवढंच नाही, जेव्हा दहशतवाद्यांनी ३ लहान मुलांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नीरजाने अंगावर गोळ्या घेत वीरमरण पत्करलं. 

पाकिस्तान, अमेरिकन सरकारकडूनही शौर्य पुरस्कार
नीरजा भनोटचं हे साहस पाहून, नीरजाला मरणोप्रांत २३ व्या वर्षी अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नीरजाला पाकिस्तान तसेच अमेरिकेनेही शौर्य पुरस्कार दिला.

५ सप्टेंबर १९८६
ही घटना ५ सप्टेंबर १९८६ साली कराची एअरपोर्टवर घडली होती. नीरजा तिच्या फ्लाईटची हेड पर्सन होती. नीरजा पॅन अॅम या विमान कंपनीत एअर होस्टेस होती, ही फ्लाईट मुंबईहून न्यूयॉर्कला जात असतांना कराचीत दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं.

सिनेमा १९ फेब्रुवारी २०१६ रोजी रिलीज होणार
या चित्रपटात नीरजा भनोटची भूमिका सोनम कपूर पार पाडतेय, तर नीरजाच्या आईची भूमिका शबानी आझमी साकारत आहे. हा सिनेमा १९ फेब्रुवारी २०१६ रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात हायजॅकची कहाणी चित्रित करण्यात आली आहे.