पाहा कपिल शर्माच्या शोमध्ये कोण असणार नवे कलाकार

कपिल शर्माने त्याच्या शोमधील गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरवर पर्याय शोधला आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद झाल्यानंतर सुनील सोबत अली, सुगंधा आणि चंदनने देखील शो सोडला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोला मोठं नुकसान होणार आहे.

Updated: Mar 30, 2017, 08:10 PM IST
पाहा कपिल शर्माच्या शोमध्ये कोण असणार नवे कलाकार title=

मुंबई : कपिल शर्माने त्याच्या शोमधील गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरवर पर्याय शोधला आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद झाल्यानंतर सुनील सोबत अली, सुगंधा आणि चंदनने देखील शो सोडला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोला मोठं नुकसान होणार आहे.

दोन दिवसापूर्वी चॅनेलच्या ऑफिशियल साईटवर शोमध्ये नवे सदस्यांच्या एंट्री होणार असल्याचा संस्पेन्स तयार केला गेला. चॅनेलने ट्विट करत म्हटलं की, कोणी तरी येत आहे कपिलाच्या मोहल्ल्यात. आपल्या कलेचा धमाका करण्यासाठी. द कपिल शर्मा शोमध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी यो शोशी जोडलेले राहा.

प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीवर यांची मुलगी जॅमी लीवर ही या शोमध्ये आता दिसणार आहे. सोबतच पाहुणा कलाकार म्हणून राजू श्रीवास्तव देखील या शोमध्ये दिसणार आहे.

बुधवारी शोचं शूट झालं ज्यामध्ये जॅमी दिसली. शोसाठी तिने शूटिंग सुरु केलं आहे. जॅमीने कपिलसोबत याआधी 'किस किस को प्यार करूं' सिनेमामध्ये काम केलं आहे.