नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतप भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐकटं पाडण्याची भूमिका भारताने जगासमोर ठेवली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला.
पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात काम न देण्याची भूमिका अनेकांनी घेतल्या. पण आता एकेकाळी पाकिस्तानच्या कलाकारांबद्दल पुळका आलेल्या सलमान खानला पाकिस्तानने दणका दिला आहे.
'द नेशन'च्या रिपोर्टनुसार तेथील जनतेला हवं आहे की, भारतीय वाहिन्यांविरोधोत कडक भूमिका घ्यावी. पाकिस्तानची इलेक्ट्रानिक मीडिया रेगुलेशन अॅथोरिटी (PEMRA) ने 15 ऑक्टोबरनंतर कोणत्याही भारतीय चॅनल आणि कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.
बिग बॉस-१० हा भारतसह इतर देशांमध्ये देखील प्रसारित होतो. पण पाकिस्तानमध्ये यावर बंदी आणली आहे. पाकिस्तानमध्ये सलमानचे अनेक फॅन्स आहेत. पण त्यांना आता सलमानचा हा शो बघता येणार नाही आहे.