आमीर बनलाय भोजपुरी..

आमीरच्या आगामी "पीके" चित्रपटातील भोजपुरी लूकमुळे या भाषेला घटनात्मक दर्जा मिळेल, अशी आशा या भोजपुरी भाषिकांना वाटत आहे. 

Updated: Dec 1, 2014, 09:46 PM IST
आमीर बनलाय भोजपुरी..  title=

मुंबई : आमीरच्या आगामी "पीके" चित्रपटातील भोजपुरी लूकमुळे या भाषेला घटनात्मक दर्जा मिळेल, अशी आशा या भोजपुरी भाषिकांना वाटत आहे. 

भोजपुरीला हा दर्जा मिळावा म्हणून मागील अनेक दिवसांपासून राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; पण त्याला अद्याप म्हणावे तसे यश मिळत नाही. 
आमीरने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरीसुद्धा त्याने भोजपुरी भाषेत केलेल्या ट्विटमुळे या मागणीला आणखी बळ मिळू शकते, असे भोजपुरी नेत्यांना वाटते. आमीर खानने भोजपुरी भाषा शिकण्यासाठी दोन वर्षे विशेष मेहनत केली होती. 

"पीके" मधील आमीरचे बहुतांश संवाद हे भोजपुरी भाषेतील आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाचे आपोआप प्रमोशन होईल. असं म्हणायला हरकत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.