'सैराट'च्या आर्चीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

मराठी सिनेसृष्टीत भव्यदिव्य यश मिळवणाऱ्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना घडलीये. याप्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आलीये. 

Updated: Mar 23, 2017, 04:20 PM IST
'सैराट'च्या आर्चीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत भव्यदिव्य यश मिळवणाऱ्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना घडलीये. याप्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आलीये. 

अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली. हा आरोपी तरुण ठाण्याचा रहिवासी आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचे नाव आहे. 

सैराटला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीमुळे रिंकू एका रात्रीत स्टार झाली होती. तिचे चाहते झपाट्याने वाढले होते. त्यामुळे जिथे जिथे रिंकू जात होती तेथे तिच्यासोबत बॉडीगार्ड असतं.