थायलंडमध्ये देखण्या तरुणीसोबत 'दगडू'चा रोमान्स

मराठी अभिनेता प्रथमेश परब अभिनेत्री 'आयली घिया'सोबत रोमान्स करताना एका व्हिडीओत दिसतो.

Updated: Apr 14, 2016, 06:02 PM IST

मुंबई : मराठी अभिनेता प्रथमेश परब अभिनेत्री 'आयली घिया'सोबत रोमान्स करताना एका व्हिडीओत दिसतो. '35% काठावर पास' या चित्रपटातील हे गाणं आहे. 

या सिनमातील 'मोहरले हे' हे गाणं रिलीज झाल्यानंतर व्हायरल झालं आहे. हा सिनेमा सतिश मोतलिंग दिग्दर्शित हा सिनेमा 20 मे 2016ला रिलीज होणार आहे. 

प्रथमेश यापूर्वी केतकी माटेगावकर आणि मिताली मयेकरसोबत वेगवेगळ्या सिनेमात झळकली होती. 

हे गाणं आदर्श शिंदे आणि सायली पंकज यांनी गायलं आहे. सिनेमातील हे गाणे अतिशय रोमँटिक असून याचे चित्रीकरण थायलँडमध्ये झाले आहे. प्रथमेश यात लव्हरबॉय दिसतोय. तसेच आयली आकर्षक दिसतेय.