कोकिलाबेन हॉस्पिटलमधला प्रत्युषाचा व्हिडिओ

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Updated: Apr 2, 2016, 08:06 PM IST
कोकिलाबेन हॉस्पिटलमधला प्रत्युषाचा व्हिडिओ title=

मुंबई: बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल राज सिंग याला ताब्यात घेतलं आहे. 

प्रत्युषाच्या संशयास्पद मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रत्युषाचा मृत्यू गुदमरून झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. 

शुक्रवारी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये प्रत्युषाला मृत घोषित करण्यात आलं. यावेळचा कोकिलाबेन हॉस्पिटलमधला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्युषाच्या पार्थिवाबरोबर अभिनेत्री डॉली बिंद्रा, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलीस धावपळ करताना दिसत आहेत. 

कोकिलाबेन हॉस्पिटलमधला व्हिडिओ