राहुल - डिंपीच्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता

एका टीव्ही रिअॅलिटी कार्यक्रमा दरम्यान विवाह बंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि त्याची पत्नी डिंपी यांचे मार्ग वेगळे झालेत. या उभयतांना घटस्फोट मान्य झालाय. 

Updated: Feb 27, 2015, 10:02 PM IST
राहुल - डिंपीच्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता  title=

नवी दिल्ली : एका टीव्ही रिअॅलिटी कार्यक्रमा दरम्यान विवाह बंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि त्याची पत्नी डिंपी यांचे मार्ग वेगळे झालेत. या उभयतांना घटस्फोट मान्य झालाय. 

फेसबुकवर टाकलेल्या एक पोस्टवरून राहुल महाजन यानं आपला आणि डिंपीचा घटस्फोट झाल्याचं घोषित केलंय. 

'आजपासून आम्ही केवळ मित्र आहोत' असं राहुलनं या पोस्टमध्ये म्हटलंय. यानंतर, काही वेळातच डिंपीनं आपलं नाव बदललंय. डिंपी महाजन हे नाव बदलून तीनं तिचं अगोदरचं डिंपी गांगुली हे नाव धारण केलंय. 

 

'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या कार्यक्रमात या दोघांचा विवाह पार पडला होता. यानंतर या दोघांचं नातं एका वर्षांतच हेलकावे खावू लागलं. डिंपीनं राहुलवर घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.