रिव्ह्यू: नटवरलाल इमराननं पुन्हा एकदा फसवलं!

बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ नावानं आपली जागा बनवलेला अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘राजा नटवरलाल’ या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकला. इमरानच्या टिपिकल चित्रपटांपेक्षा हा थोडा वेगळा आहे. लबाड ‘मिथिलेश कुमार’च्या भूमिकेत इमरानचं कॅरेक्टर आपल्याला आश्चर्यासह काही सूचनाही करतं. ‘मर्डर’पासून आतापर्यंत इमरानचा अभिनय कसा सुधारलाय, हे दिसतं. 

Updated: Aug 30, 2014, 09:36 AM IST
रिव्ह्यू: नटवरलाल इमराननं पुन्हा एकदा फसवलं! title=

मुंबई: बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ नावानं आपली जागा बनवलेला अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘राजा नटवरलाल’ या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकला. इमरानच्या टिपिकल चित्रपटांपेक्षा हा थोडा वेगळा आहे. लबाड ‘मिथिलेश कुमार’च्या भूमिकेत इमरानचं कॅरेक्टर आपल्याला आश्चर्यासह काही सूचनाही करतं. ‘मर्डर’पासून आतापर्यंत इमरानचा अभिनय कसा सुधारलाय, हे दिसतं. 

कथानक

कुणाल देशमुखच्या या चित्रपटात इमरान उर्फ ‘राजा’ एक ठगाच्या भूमिकेत आहे, जो लोकांना फसवतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो. चित्रपटात खूप चढ-उतार आहेत. ‘राजा’चा पार्टनार राघव (दीपक तिजोरी)ची हत्या त्याच्या समोर होते. आपल्या पार्टनरच्या हत्येनंतर राजा त्याचा बदला घ्यायचं ठरवतो. खलनायकाच्या भूमिकेत के. के. मेनन आहे. त्याच्या भूमिकेचं नाव वरधा यादव... ‘राजा’चा बदला घेण्याची पूर्ण कथा आपल्याला बांधून ठेवतो. चित्रपटात विनोदालाही योग्य जागा देण्यात आलीय. काही असे दृश्य आहेत की, ज्यावर आपण आपलं हसणं रोखूच शकत नाही. 

राजा (इमरान हाश्मी) रस्त्यावर तीन पत्ती खेळत त्यातली राणी शोधण्याच्या खेळात लोकांना फसवून पैसे कमावतो. छोट्या-मोठ्या फसवणुकीमध्ये राघव (दीपक तिजोरी) त्याचा पार्टनर. राघवला राजा आपला मोठा भाऊ मानतो आणि त्याच्याच सोबत राहतो. जिया (हुमैमा मलिक) राजाची गर्लफ्रेंड आहे. जी एक बार डांसर आहे. राजा एक मोठा हात मारू इच्छितो आणि त्याला 80 लाखांची चोरी करण्याची संधी मिळते.  

राघव त्याला समजावतो की, मोठा हात मारण्यात धोका आहे, पण राजा ऐकत नाही. दोघं मिळून 80 लाख चोरतात. हा पैसा मोठा अपराधी वरधा यादव (के.के.मेनन) याचा असतो. त्याला लगेच कळतं पैसा कुणी चोरलाय. राघवची तो हत्या करवतो, तर राजा वाचतो. 

राघवच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो त्याला फसवण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी ठगीचे गुरू योगींना (परेश रावल) ला राजा भेटतो आणि त्यांची मदत मागतो. योगी नात्यानं राघवचा सख्खा भाऊ असतो. तो राजाला मदत करायला तयार होतो. वरधा क्रिकेट वेडा असतो. त्याच्या याच कमजोरीचा राजा आणि योगी फायदा घेतात. आयपीएलच्या धर्तीवर एका लीगमध्ये राजा आणि योगी वरधाला अशी टीम विकण्याचा प्लान करतात, जी अस्तित्त्वातच नाहीय.  

संगीत आणि दिग्दर्शन

चित्रपटाला संगीत युवान शंकर राजाने दिलंय. गाणी ऐकायला चांगली आहेत. इमरानच्या फॅन्ससाठी अरजित सिंह आणि श्वेता पंडितनं गायलेलं ‘तेरे होके रहेंगे’ पहिलेच हीट झालंय. जेव्हा की मीका सिंहच्या आवाजात ‘दुक्की तिक्की’ गाणं आपण गुणगुणवतो.

चित्रपटात इमरानची ओळख अर्थात ‘किसिंग किलर’च्या इमेजचाही दिग्दर्शकानं पूर्ण उपयोग केलाय. इमरानच्या किसिंग दृश्यासाठी चित्रपटात जागा ठेवण्यात आलीय आणि पटकथेत त्याला योग्य पद्धतीनं मांडलंय. ‘किसिंग’ची महारथ मिळवलेल्या इमराननं हॉलिवूडच्या दिग्गजांनाही मागे टाकलंय. सिनेमेटोग्राफर राज ए. चक्रवर्तीनं उल्लेखनीय काम केलंय. 

एकूणच हा चित्रपट एकदा बघू शकतो. परेश रावलला आणखी न्याय देता येवू शकला असता आणि पटकथेला आणखी चांगल्या पद्धतीनं लॉजिकल शेवट करता आला असता.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.