close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

म्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो

सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.

Updated: Aug 8, 2016, 09:10 PM IST
म्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं. तसंच या अकाऊंटवरून हॅकर्सनी आमीर खान आणि शाहरुखला फॉलो केलं होतं. 

थोड्यावेळानं रजनीकांतचे हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं. यानंतर मात्र रजनीकांतनं आमीर खान आणि शाहरुखला अनफॉलो केलं. ट्विटरवर रजनीकांत फारसे सक्रीय नसतात. 

ट्विटरवर रजनीकांत एकूण 23 अकाऊंट फॉलो करतात. यातली सहा अकाऊंट सेलिब्रिटींची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, ए.आर.रेहमान यांच्याबरोबरच रजनीकांत यांनी त्यांच्या दोन मुली सौंदर्या, ऐश्वर्या आणि जावई धनुषला फॉलो करतात. तर उरलेली अकाऊंट ही पंतप्रधान कार्यालय, न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांची आहेत.