नवी दिल्ली: पॉर्न वेबसाइट्सवर सरकारनं बंदी घातल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झालाय. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विट करत पॉर्न वेबसाइट्स बंदीचा विरोध केलाय. वर्मानं ट्विटमध्ये म्हटलं, 'आता सरकारनं पॉर्नवर बंदी घातली लवकरच सरकार बेडरूममध्ये पाहायला येऊ शकतं की, कपल्स कशापद्धतीनं सेक्स करत आहेत?'
And I think the government will direct couples on their positions and instruct them on the do's and dont's ..This for sure will b next step
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2015
वर्मानं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं, 'मला वाटतं सरकार कपल्सला पोझिशनबद्दलही निर्देश देतील आणि सांगेल काय करावं आणि काय नाही? नक्की हे पुढचं पाऊल असेल.'
This basically means that it's going to be so many lesser votes for the government in the next election
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2015
रामगोपाल वर्मा एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं, की भारतीय पॉर्नला पसंत करतात. संपूर्ण ऑनलाइन ट्रॅफिकमध्ये भारताचं रँकिंग पहिल्या पाचमध्ये आहे जेव्हा की यूएस नंबर एक वर आहे. 50 टक्के भारतीय आपल्या फोनवरून पॉर्नहबपर्यंत पोहोचतात. संपूर्ण अँड्रॉईड ट्रॅफिकमध्ये भारताचं रँकिंह तिसरं आणि अमेरिका, ब्रिटन पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहे. वर्मानं आपल्या एका ट्विटमध्ये सांगितलं की, याचा अर्थ सरकारला पुढील निवडणुकीत कमी मतं मिळतील.
Now they have just banned porn but very soon the Government might come into the bedroom to see how couples are having sex
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2015
भारतीय दूरसंचार विभागानं शुक्रवारी 857 पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिलाय. बीएसएनएल, एमटीएनएल आणि वोडाफोननं आपल्या नेटवर्कवर पॉर्न साइट्स ब्लॉक केल्या आहेत.
Indians love porn and the proof is India currently ranked #5 in overall traffic online, with USA ranking at #1
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.