करण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम

Updated: Jun 15, 2016, 12:24 PM IST
करण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'

मुंबई: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम आहे. बॉलिवूडमध्ये सैराट सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आवर्जुन सैराट पाहिला. करन जोहर, अभिनेता रणबीर कपूर, वरून धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नुकताच सैराट पाहिला आणि त्यानंतर त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

सैराट सिनेमाने ८५ कोटीहून अधिकची कमाई केली असून एक नवा इतिहास रचला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही सिनेमाचं कौतुक होतंय. अभिनेता इरफान खान, दिग्दर्शक अनुराग कश्यप, सुभाष घई या दिग्गजांनीही सिनेमाचं याआधी कौतुक केलं होतं. 

सैराट सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्पेशल स्क्रिनिंगला करन जोहर, आलिया भट, वरूण धवन, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर यांनीही हजेरी लावली. 

करन जोहरने म्हटलं की, 'अजूनही सिनेमातून बाहेर येत नाही आहे. इतका सिनेमाचा प्रभाव पडला आहे. काल रात्री हा सिनेमा पाहिला आज सकाळी जड हृदयाने झोपेतून उठलो. या सिनेमासाठी खूप आदर आहे'.