'मौके पे चौका' या विधानावर रणबीरचे स्पष्टीकरण

प्रदर्शनाआधीच वादात राहिलेला ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होतेय. 

Updated: Oct 30, 2016, 03:01 PM IST
'मौके पे चौका' या विधानावर रणबीरचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रदर्शनाआधीच वादात राहिलेला ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होतेय. 

रणबीर आणि ऐश्वर्या यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा जोरदार होतेय. सिनेमाचा ट्रेलर आल्यापासूनच रणबीर आणि ऐश्वर्या यांच्यातील हॉट केमिस्ट्रीची चर्चा रंगलीये.

एका मुलाखतीदरम्यान रणबीरने ऐश्वर्यासोबतचे सीन्स कसे केले याबाबतही सांगितले. पहिल्यांदा ऐश्वर्याला स्पर्श करतानाही मला घाम फुटला होता. त्यावेळी ऐश्वर्याने सांगायची की आपण अभिनय करत आहोत त्यावेळी मी विचार केला आता पुन्हा अशी संधी मिळायची नाहीय त्यामुळे मी मौके पे चौका मारला, असे रणबीर मुलाखतीत म्हणाला होता. 

रणबीरच्या या मौके पे चौका या वक्तव्यानंतर पुन्हा बी-टाऊन तसेच त्याच्या फॅन्समध्ये चांगलीच चर्चा होतेय.यावर स्पष्टीकरण देताना रणबीर म्हणाला, ऐश्वर्या चांगली अभिनेत्री आहे तसेच फॅमिली फ्रेंडही आहे. ऐ दिल हैमधील तिच्या योगदानासाठी मी नेहमीच तिचा आभारी असेन. मात्र मला कोणत्याही प्रकारे तिचा अपमान करायचा नव्हता.