राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो...

 राणी मुखर्जीची मुलगी आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते संपूर्ण फेक होते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे सोशल मीडियावर कोणतेही प्रोफाइल नाही. 

Updated: Jul 12, 2016, 05:31 PM IST
 राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो... title=

मुंबई :  राणी मुखर्जीची मुलगी आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते संपूर्ण फेक होते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे सोशल मीडियावर कोणतेही प्रोफाइल नाही. 

राणी मुखर्जीच्या चाहत्यांमध्ये तिच्या मुलीचे फोटो सर्क्लुट झाल्यानंतर या अभिनेत्रीच्या प्रवक्तांने हे फोटो खोटे असल्याचे स्पष्ट केले.  राणी मुखर्जीचे इन्स्टाग्रामवर कोणतेही प्रोफाइल नाही. त्यामुळे हे फोटो खोटे आहे. राणीच्या चाहत्यांना वाटले की राणीने आपल्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. 

राणी मुखर्जीच्या प्रवक्ताने स्पष्ट केले की, तिचे असे कोणतेही इन्स्टाग्राम खाते नाही. ती कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नाही. अशा प्रकारचे खोटे अकाउंट समोर येत असतात. पण प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी यावर विश्वास ठेवू नये असेही निवेदनात म्हटले आहे. 

गेल्या वर्षी राणी मुखर्जीने एका मुलाला जन्म दिला. पण तिचा एकही फोटो मीडियात आला नाही. पण गेल्या काही दिवसापूर्वी एक फोटो व्हायरल झाला. त्यात राणी मुखर्जीची मुलगी असल्याचा दावा करण्यात आला होता.