मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची रिलेशनशिप पाहिल्यावर कोणलाही आपली रिलेशनशीप अशीच असावी असं वाटेल. सध्या दोघे श्रीलंकेत आहेत. नाही, ते फिरायला गेले नाहीयेत. तर दीपिकाच्या एका बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे... आणि ते ही श्रीलंकेत. म्हणून सध्या दोघे श्रीलंकेत गेलेत.
त्याच लग्नात दोघांनी एक धमाकेदार डान्स केलाय. सध्या त्याच डान्सचा एक व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय झालाय. 'बलम पिचकारी' या गाण्यावर दोघांनी धम्माल करत डान्स केलाय. रणवीरच्या फॅन्सनी खरं तर हा व्हिडिओ अपलोड केलाय.
[VIDEO] Ranveer Singh and Deepika Padukone dancing to Balam Pichkari at the wedding in Sri Lanka. pic.twitter.com/hLZPSwCwk3
— Ranveer Planet (@RanveerPlanet) March 26, 2016
रणवीर आणि दीपिका रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या 'रामलीला'पासूनच यायला सुरुवात झाली होती. आजवर खरंतर दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी अधिकृत वाच्यता केलेली नाही. पण, कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवायचा राहात नाही.
[PIC] Ranveer Singh and Deepika Padukone at the wedding in Sri Lanka. pic.twitter.com/7s6RrDiURt
— Ranveer Planet (@RanveerPlanet) March 26, 2016
सध्या रणवीर सिंग आदित्य चोप्राच्या 'बेफिकरे'चं शूटिंग करतोय, तर दीपिका तिच्या हॉलिवूड पदार्पणाचं शूटिंग कॅनडात करतेय. पण, तिच्या बेस्ट फ्रेंड्च्या लग्नात जाण्यासाठी दोघांनीही वेळ काढला. आता त्यांचा डान्स चर्चेत आहे.