मुंबई : न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत.
रणवीर-दीपिका आगामी पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र त्यातून ब्रेक घेत दोघेही दुबईत न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेलेत. बुधवारी रात्री ही जोडी मुंबई विमानतळावर दिसली.
यावेळी दीपिका आणि रणवीर यांना या ट्रिपबाबत प्रश्न विचारले असता त्या दोघांनी उत्तर न देणेच पसंत केले.