व्हिडिओ : श्रेयस तळपदेचा मराठमोळा 'बाजी'

मराठीत 2008 साली ‘सनई-चौघडे’ या चित्रपटात दिसलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल सात वर्षानंतर ‘बाजी’ या चित्रपटातून मराठीत पुन्हा एन्ट्री करतोय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 3, 2014, 11:11 AM IST
व्हिडिओ : श्रेयस तळपदेचा मराठमोळा 'बाजी' title=

मुंबई : मराठीत 2008 साली ‘सनई-चौघडे’ या चित्रपटात दिसलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल सात वर्षानंतर ‘बाजी’ या चित्रपटातून मराठीत पुन्हा एन्ट्री करतोय. 

मधल्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत रमलेल्या श्रेयसला पुन्हा एकदा माय मराठीनं साद घातलीय. बाजी या चित्रपटात श्रेयसला साथ देतेय अभिनेत्री अमृता खानविलकर... तर जितेंद्र जोशी मात्र, या चित्रपटात नकारात्मक भूमिका रंगवताना पाहायला मिळेल. 

तर, 38 वर्षीय श्रेयसच्या होम प्रोडक्शनचा 'पोश्टर बॉईज' हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

'बाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय 'पुणे 52'फेम निखिल महाजन यानं... हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच 6 फेब्रुवारी 2015 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  

 

व्हिडिओ पाहा : ‘बाजी’चा ट्रेलर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.