टोरंटो : रणवीर सिंग याने दीपिका पदुकोण हिला व्हॅलेंटाइनचे बिग सरप्राइज दिले आहे. तो आपल्या व्हॅलेंटाइनला भेटण्यासाठी थेट कॅनडामध्ये गेला आहे.
सध्या दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पणाचा सिनेमा xXx: The Return of Xander Cage ची शुटिंग करत आहे.
रणवीर सिंग यांने दीपिकाला व्हॅलेंटाइन वीकचे सरप्राइज देण्याचे ठरविले. त्याने दीपिकासोबत व्हॅलेंटाइन वीक घालविण्याचे ठरवले. मग त्याने टोरंटोची फ्लाइट पकडली आणि आपल्या लव लेडीला भेटायला गेला.
सध्या रणवीर यशराजचा बेफिकरी'चे मुंबईत शुटींग करत आहे. पण आपल्या व्यस्त शेड्युलमध्ये आपल्या प्रेमासाठी त्याने वेळ काढला.
रणवीरने आपल्या फॅनसोबत टोरंटो विमानतळावर फोटो काढला. तसेच रणवीरने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला. त्यात मुंबईच्या टॅक्सीवर xXx स्टीकर दाखविले. भारतात या चित्रपटाचे आतापासून क्रेझ सुरू झाल्याचे तो म्हटला आहे.
Check it out! Already a rage in India! #XXX @deepikapadukone all the best for your 1st day of shoot! Kill it! pic.twitter.com/Pa5sx88Oet
— Ranveer Singh (@RanveerOfficial) February 9, 2016