मुंबई: रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर हे दोघंही एकमेकांचे अगदी जिगरी दोस्त आहेत, त्याचबरोबर या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.
गुंडे या चित्रपटातील अर्जुन आणि रणवीर यांचे नातं खऱ्या आयुष्यातही तसंच आहे. हे पटवून देताना अर्जुन म्हणतो, लग्नाबाबतचा कायदा बदलला, तर त्याच दिवशी आम्ही दोघं लग्न करू.
यावरून अर्जुन लग्नाबाबत किती उत्साहित आहे, हे समजतं. हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळं आता यावर रणवीरची गर्लफ्रेंड दीपिका काय प्रतिक्रिया देते, हे पाहणं मजेशीरच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.