बॉलिवूड अभिनेत्यानविरोधात टिव्ही कलाकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एका बॉलिवूड अभिनेत्यावर टिव्ही अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय.

Updated: Oct 18, 2015, 09:22 PM IST
बॉलिवूड अभिनेत्यानविरोधात टिव्ही कलाकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल title=

मुंबई: एका बॉलिवूड अभिनेत्यावर टिव्ही अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय.

चारकोप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितलं की, अभिनेता विशाल ठक्कर विरोधात शनिवारी बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आणखी वाचा - 'हेट स्टोरी 3' TRAILER : प्रेम, वासना आणि बिझनेस!

पोलिसांनी सांगितलं की, पीडित तरुणीनं टिव्ही सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. तरुणीनं आरोप केलाय की, अभिनेत्यानं त्याच्या घरात तिच्यावर बालात्कार केला. याप्रकरणात कलम ३७६, ४२०, ३२३, ५०९ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

अभिनेत्याला अजून अटक करण्यात आली नाहीय. त्यानं टँगो चार्ली आणि चांदनी बार सारख्या चित्रपटांमध्ये छोटी भूमिका केलेली आहे. 

आणखी वाचा - कृष्णा श्रॉफनं पुन्हा शेअर केले 'टॉपलेस' फोटो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.