बंगळुरू: अभिनेता अजय देवगणनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच द्यायला हवी, अशी मागणी केलीय. बलात्कार करणं म्हणजे हत्या करण्यापेक्षाही मोठा अपराध असल्याचं तो म्हणाला.
अजय म्हणाला, “प्रत्यक्षात मी या गुन्हाला समजूच शकत नाहीय. हा हत्येपेक्षाही मोठा अपराध आहे. माझ्या हातात असतं तर मी अशा सर्व गुन्हेगारांना फासावर लटकवलं असतं.”
अजय देवगण सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम रिटर्न्स चित्रपट्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात जास्त नाट्य आणि वास्तविक ऍक्शन असल्याचं अजयनं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.