रश्मी देसाई साकारणार अंगुरी भाभी?

'भाभीजी घर पर है' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या अंगुरी भाभीची भूमिका करणारी शिल्पा शिंदे या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे आता शिल्पाच्या जागी अंगुरी भाभीची भूमिका कोण कऱणार याबाबत तर्कवितर्क लढवले जातायत. 

Updated: Mar 7, 2016, 10:39 AM IST
 रश्मी देसाई साकारणार अंगुरी भाभी? title=

मुंबई : 'भाभीजी घर पर है' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या अंगुरी भाभीची भूमिका करणारी शिल्पा शिंदे या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे आता शिल्पाच्या जागी अंगुरी भाभीची भूमिका कोण कऱणार याबाबत तर्कवितर्क लढवले जातायत. 

अभिनेत्री रश्मी देसाई अंगुरी भाभीची भूमिका कऱणार असल्याचे बोलले जातेय. मात्र याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. 

मानधनाच्या मुद्द्यावरुन शिल्पा आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या वादामुळे शिल्पा या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिका शिल्पा सुंदररित्या करत होती. यामुळेच ही मालिका वर्षभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र आता ती बाहेर पडत असल्याच्या चर्चांनी तिचे फॅन्स मात्र नाराज झालेत.