कन्नड सैराटमध्ये रिंकूच साकारणार अर्चीची भूमिका ?

सैराट हा सिनेमा आता कन्नड भाषेत बनणार

Updated: Jul 15, 2016, 07:46 PM IST
कन्नड सैराटमध्ये रिंकूच साकारणार अर्चीची भूमिका ? title=

मुंबई : महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार ज्या चित्रपटाने प्रेक्षकांपासून  बॉलिवूड कलाकारांपर्यत अनेकांचे मन जिकंले त्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा आता कन्नड भाषेत बनणार आहे.

सैराटमधून प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरुची भूमिका या कन्नड सिनेमामध्ये कोण करेल असा अनेकांना प्रश्न पडला असेल पण या सिनेमात देखील रिंकू राजगुरूच भूमिका साकारेल अशी चर्चा आहे. या सिनेमाचे प्रोड्यूसर व्यकंटेश यांना आणि त्यांच्या टीमला रिंकूला इतर पर्याय नसल्याचं वाटत आहे..

कर्नाटकात २ हजारहून अधिक अभिनेत्रींचं ऑडिशन घेण्यात आलं पण मराठीत आर्ची साकारणाऱ्या रिंकू राजगुरू सारखा रोल कोणालाच न जमल्याने रिंकूलाच या सिनेमामध्ये घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

रिंकूने अजून यावर काहीही निर्णय घेतलेला नाही तर परश्याच्या भूमिकेसाठीही शोध सुरु आहे.