मुंबई : आपल्या गोड हास्यानं अनेकांना मोहवून टाकणारी अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा हिच्यासमोर पुन्हा एकदा लग्नासाठी प्रस्ताव आलाय... आणि मुख्य म्हणजे जेनेलियानं लग्नाचा हा प्रस्ताव स्वीकारही केलाय.
जेनेलियाचा पती अभिनेता रितेश देशमुखनंच जेनेलियासमोर पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव मांडलाय. रितेशनं प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करून आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. 'हा एक कमाल कार्यक्रम होता' असं रितेशनं या फोटोखाली कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.
यावर, 'खूप चांगला दिसतोयस... मला वाटतंय माझं हृदय पुन्हा एकदा रितेशवर येऊन थांबवलंय' असं जेनेलियानं याखाली म्हटलंय. यानंतर रितेशनं ट्विटवरवरच आपल्या पत्नीसमोर पुन्हा एकदा लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.
त्यानं जेनेलियाला विचारलं 'जेनेलिया, तू माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार?'... याचं उत्तर देताना जेनेलियानं म्हटलं 'निश्चितच, पण केवळ यासाठी कारण रिआन म्हणतोय की जगातील सर्वोत्तम पिता आहेस'
रितेश-जेनेलिया हे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. 'तुझे मेरी कसम' आणि 'तेरे नाल लव हो गया' या दोन सिनेमांत हे जोडपं एकत्र दिसलं होतं. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांच्या आयुष्यात त्यांच्या बाळानं - रिआननं प्रवेश केलाय.
That was a great show @RRathoreCo - pic.twitter.com/3bjVraOLa0
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 19, 2015
Hey Good Looking!! I think I have a crush on @Riteishd: That was a great show @RRathoreCo - pic.twitter.com/l4sPmvye0z”
— Genelia Deshmukh (@geneliad) March 19, 2015
@geneliad will you marry me?
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 20, 2015
@Riteishd he he he Ofcourse but only because Riaan says your the best dad in the world
— Genelia Deshmukh (@geneliad) March 20, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.