'रॉक ऑन २'च्या या गाण्यामधून होणार मुंबई दर्शन

'रॉक ऑन 2'चं अँथम साँग रिलीज झालं आहे. या गाण्याला एका वेगळ्या अंदाजात शूट केलं गेलं आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्थळाजवळ हे गाणं शूट केलं गेलं आहे.

Updated: Oct 19, 2016, 11:03 PM IST
'रॉक ऑन २'च्या या गाण्यामधून होणार मुंबई दर्शन title=

मुंबई : 'रॉक ऑन 2'चं अँथम साँग रिलीज झालं आहे. या गाण्याला एका वेगळ्या अंदाजात शूट केलं गेलं आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्थळाजवळ हे गाणं शूट केलं गेलं आहे.

मुंबईतील काही अशा ठिकाणांवर हे गाणं शूट केलं गेलं आहे जेथून रात्री मुंबई वेगवेगळ्या रंगामध्ये दिसते. या गाण्यातून मुंबई दर्शन होतांना दिसत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, एअर इंडिया बिल्डिंग, गेटवे ऑफ इंडिया, महापालिका येथे शूट करण्यात आलं आहे. 11 नोव्हेबर हा सिनेमा रिलीज होणार आहे. रॉक ऑन 2 चे गाणे एका वेगळ्या प्रकारे तयार करण्यात आले आहे. म्यूझिकवर हा सिनेमा आधारीत असणार आहे.

'रॉक ऑन'मध्ये ही एक मॅजिक बँड होता. फरहान अख्तर, अर्जुन रामपाल आणि पूरब कोहली, प्राची देसाई सारखी नावे यामध्ये होती. श्रद्धा कपूर आणि शशांक अरोरा ही दोन नावे या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत.

पाहा व्हिडिओ