रुस्तमची बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग

अक्षय कुमार स्टारर रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवलीये.

Updated: Aug 13, 2016, 04:29 PM IST
रुस्तमची बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग title=

मुंबई : अक्षय कुमार स्टारर रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवलीये.

हृतिक रोशनचा मोहंजोदडो आणि अक्षयचा रुस्तम हा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित झाला. मात्र या स्पर्धेत पहिल्या दिवशी रुस्तमने बाजी मारलीये.

रुस्तमने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १४.११ करोडची कमाई केलीये. मर्डर मिस्ट्री असलेल्या रुस्तमला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

रुस्तमची ही ओपनिंग या वर्षातील चौथी सर्वात मोठी ओपनिंग आहे. या यादीत सुल्तान प्रथम स्थानी असून त्यापाठोपाठ फॅन, हाऊसफुल्ल३ यांचा नंबर लावतो.