जुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वर्षाचं म्हणजेचं वर्षा बंगल्याचं मनोगत व्यक्त करणारं पत्र आलं. 

Updated: Nov 19, 2015, 09:44 PM IST
जुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वर्षाचं म्हणजेचं वर्षा बंगल्याचं मनोगत व्यक्त करणारं पत्र आलं. 

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

हे पत्र चला हवा येऊ द्याचा कलाकार सागर कारंडेने आपल्या स्टाईलमध्ये वाचून दाखवलं.

सागर कारंडेने वर्षाचं पत्र वाचलं तेव्हा, नारायण राणे काही वेळ गहिवरले, हसले, रोमॅन्टिक झाले, मात्र नारायण राणे यांनी हे पत्र काळजीपूर्वक शांतपणे ऐकून घेतलं. 

सागर कारंडे यांने हे पत्र आपल्या स्टाईलमध्ये वाचून दाखवलं, यात वर्षा बंगल्याने नारायण राणे यांना कुठंतरी चुकतंय, असा सूचक सल्ला देखील दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.