सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट पण करीनासाठी नव्हे तर...

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.

Updated: Mar 26, 2017, 06:45 PM IST
सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट पण करीनासाठी नव्हे तर...

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.

मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानने आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी हे महागडे गिफ्ट खरेदी केलेय आणि ती व्यक्ती म्हणजे करीनाची आई अर्थात सासू बबितासाठी नवा फ्लॅट खरेदी केलाय. 

बबिता सध्या युनियन पार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. हे घर करण जोहरच्या घराच्या जवळ आहे.