करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

Updated: Apr 21, 2015, 02:32 PM IST
करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार? title=

मुंबई : इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

सिनेनिर्माता विशाल भारद्वाज यानं त्याच्या आगामी सिनेमासाठी सैफ अली खान आणि शाहिद कपूर या दोघांना साईन केलंय.

अभिनेत्री करीना कपूरचा पती सैफ अली खान आणि करीनाचा एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूर एकाच सिनेमात दिसणार असल्यानं साहजिकच अनेकांच्या नजरा याकडे वळल्यात.

शाहीद हा नेहमीच विशालचा फेव्हरेट राहिलाय. या दोघांनी 'कमिने' आणि 'हैदर' या सिनेमात आपली कमाल दाखवून दिलीच आहे. तसंच, विशालनं 'ओमकारा' या सिनेमात सैफसोबतही आपली जादू दाखवून दिलीय. 

सगळं काही सुरळीत राहीलं तर शाहीद आणि सैफची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पडद्यावर पाहायला लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.