सैराटच्या अर्चीचं खरं नाव आणि नववीचा रिझल्ट

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.

Updated: May 3, 2016, 07:52 PM IST
सैराटच्या अर्चीचं खरं नाव आणि नववीचा रिझल्ट title=

मुंबई : नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.

रिंकू राजगुरुने वैयक्तिक जीवनातही कौतूकास्पद कामगिरी केली आहे. तिने नववीत ८१.०६ टक्के मिळवले आहेत.

अर्ची या नावाने प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरू हिचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहित नसेल. तिचं नाव रिंकू नाही तर प्रेरणा आहे. तिच्या प्रगती पुस्तकावर तिचं खरं नाव तुम्हाला पाहायला मिळेल.