'सैराट'च्या सुमन अक्कांना म्हाडाच्या घराची लॉटरी

म्हाडाकडून आज मुंबईतील ९७२ घरांसाठी आज सोडत जाहीर झाली. मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले. 

Updated: Aug 10, 2016, 02:34 PM IST
'सैराट'च्या सुमन अक्कांना म्हाडाच्या घराची लॉटरी

मुंबई : म्हाडाकडून आज मुंबईतील ९७२ घरांसाठी आज सोडत जाहीर झाली. मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले. 

कलाकार कोट्यातील अनेकांनीही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला होता. यात भाग्यवान ठरले ते मराठी कलाकार ती फुलराणीची भूमिका कऱणारी हेमांगी कवी, नांदा सौख्य भरेमधील ललिता जहागिरदारची भूमिका साकारणारी सुहास परांजपे आणि सैराट सिनेमात सुमन अक्काची भूमिका साकारणाऱ्या छाया कदम. 

छाया कदम यांना सायन येथील प्रतीक्षनगर येथे घर लागलेय. त्यामुळे मुंबईतील घराचे स्वप्न सुमनअक्काचे पूर्ण झालेय. या घरांसाठी अनेक मराठी कलाकारांनी अर्ज दाखल केले होते.