सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं'

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.

Updated: May 25, 2016, 05:12 PM IST
सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं' title=

न्यू यॉर्क : सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.

नागराजच्या सैराटने अवघ्या भारतीयांना वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडणार्‍या या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत, चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना ठेका धरायला लावला. 

सोलापूरच्या कला क्षेत्राचा हा अटकेपार झेंडा सोलापूरकरांची शान राखणारा ठरला आहे. 

यावेळी मराठी रसिक प्रेक्षकांनी सैराट चित्रपटातील सर्वच गाण्यांवर झिंगाट होऊन चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले. न्यूयॉर्क येथील बॉम्बे थिएटरमध्ये महाराष्ट्र मंडळ आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बे थिएटर येथे सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.