सलमान अखेर घाबरला, माफी मागितली

सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी कान उपटल्यानंतर, अखेर सलमानने माफी मागितली आहे. याकूब मेमनला सुनावण्यात आलेल्या माफीच्या शिक्षेविषयी सलमानने वादग्रस्त ट्वीट केलं होतं, त्या विषयी सलमानने माफी मागितली आहे.

Updated: Jul 26, 2015, 05:56 PM IST
सलमान अखेर घाबरला, माफी मागितली title=

मुंबई : सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी कान उपटल्यानंतर, अखेर सलमानने माफी मागितली आहे. याकूब मेमनला सुनावण्यात आलेल्या माफीच्या शिक्षेविषयी सलमानने वादग्रस्त ट्वीट केलं होतं, त्या विषयी सलमानने माफी मागितली आहे.

आपण याकूब मेमनला निर्दोष म्हटलेलं नाही, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो, मला वडिलांचा फोन आला, आणि त्यांनी सांगितलं की, तू केलेल्या ट्वीटमुळे गैरसमज पसरत आहे, त्यानंतर मी यावर स्पष्टीकरण देत असल्याचं सलमानने म्हटलं आहे.

मी ट्वीट केलं होतं की, टायगर मेमनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, मी त्यावर अजूनही ठाम आहे. पण टायगर मेमनची शिक्षा याकूबला देऊ नका, असं सलमान खानने म्हटलं आहे.

 

पाहू या काय म्हटला सलमान नव्या ट्विटमध्ये 

 

तसेच माझे ट्विट हे धर्म विरोधी असल्याचे म्हणणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि करत राहणार .

माझ्या ट्विटमुळे झालेल्या गैरसमजाबद्दल मी बिनशर्त माफी मागतो. मी ट्विट जाणीवपूर्वक केले नव्हते.

माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि माझ्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यास सांगितले. या ट्विटमुळे गैरसमज निर्माण झाला आहे. मी यावर प्रतिक्रिया देत आहे.

अनेक निर्दोष व्यक्तींनी मुंबई बॉम्बस्फोटात आपले प्राण गमावले होते. मी पुन्हा सांगू इच्छितो की कोणत्याही निर्दोष व्यक्तीने जीव गमावणे हे सर्व मानवता गमावल्या सारखे आहे.

मी कुठेही म्हटलो नाही की याकूब मेमन हा निर्दोष आहे. माझा देशाच्या न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे.

मी ट्विट केले होते की टायगर मेमनला त्याने केलेल्या गुन्हाबद्दल शिक्षा द्यावी. मी त्यावर ठाम आहे. तसेच याकूब मेमनला फाशी देऊ नये, असेही मी म्हटलो आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.