कन्फर्म, 'बिग बॉस-8'ही सलमानच करणार होस्ट

रिअॅलिटी शो ‘बीग बॉस – सीझन 8’साठी होस्ट कोण असेल? हा प्रश्नावर निर्माण झालेला मोठा सस्पेन्स आता संपलाय. हा शो अभिनेता सलमान खानच पुन्हा एकदा होस्ट करणार आहे. 

Updated: Aug 13, 2014, 07:58 AM IST
कन्फर्म, 'बिग बॉस-8'ही सलमानच करणार होस्ट title=

मुंबई : रिअॅलिटी शो ‘बीग बॉस – सीझन 8’साठी होस्ट कोण असेल? हा प्रश्नावर निर्माण झालेला मोठा सस्पेन्स आता संपलाय. हा शो अभिनेता सलमान खानच पुन्हा एकदा होस्ट करणार आहे. 

चॅनलकडून सलमान हा शो पाचव्यांदा होस्ट करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या कार्यक्रमाचा प्रोमोही शूट करण्यात आलाय, अशीही चर्चा आहे. चॅनलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यंदाही सलमान खानच बीग बॉसचा सीझन 8 होस्ट करेल, असं जाहीर करण्यात आलंय. 

अद्याप या कार्यक्रमातील सहभागी होणारे प्रतिस्पर्धी कोण असतील, याबाबत खुलासा झालेला नाही. यापूर्वी, सलमाननं याच कार्यक्रमाचे चार पर्व होस्ट केलेत. सलमानशिवाय अर्षद वारसी, शिल्पा शेट्टी आणि अमिताभ बच्चन यांनीही हा शो होस्ट केलाय.

महत्त्वाचं म्हणजे, बीग बॉसच्या सातव्या पर्वात सलमान खाननं आपन कदाचित पुढचा सीझन होस्ट करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि रणबीर कपूर यांची नावं पुढे आली होती. परंतु, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान खानचा एक नवा अवतास बिग बॉसमध्ये पाहण्यास मिळणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.