मुंबई : बॉलीवूडचा दंबक सलमान खानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. पण आता या चर्चेला पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे. कारण सलमान खान लग्न करणार असल्याची शक्यता आहे.
सलमान खान हा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत दिसतो. त्यामुळे बॉलीवूड प्रेमींमध्ये चर्चेला उधान येतं. पण आता सलमानने लग्नचा निर्णय घेतलाय. कधी, केव्हा, कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
सलमान खान काही महिन्यांपासून रोमानियाची लूलिया वान्तुर हिच्यासोबत रिलेशनशिप आहे. पण हिट अँड रन प्रकरणी खटला सुरू असल्याने तो लग्नाचा कोणताही निर्णय घेत नव्हता.
डीएनए या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सलमानचे आई-वडील लग्नासाठी सलमानकडे आग्रह करायचे पण सलमान त्यांना म्हणायचा की, 'जर कोर्टाचा निर्णय माझ्या विरोधात गेला तर मी पत्नीला काय सांगू?, ती तिच्या मुलांना काय सांगेल की तुमचे वडील तुरूगांत आहेत.?'
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्येही जेव्हा तुरुगांतून माझी सुटका होईल तेव्हाच मी लग्नाचा निर्णय घेईल असं सलमानने म्हटलं होतं.
हिट अँड रन प्रकरणातून सलमानची निर्दोशपणे सुटका झाल्यानंतर सलमान आता लूलिया वान्तुर हिच्यासोबत लग्नाचा विचार करतोय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे २०१६ या नव्या वर्षात सलमान खान लग्न बंधनात अडकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.