कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही सलमान

 बॉलीवूड अभिनेते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये नक्कीच जातात. 

Updated: Jun 24, 2016, 09:33 PM IST
कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही सलमान title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये नक्कीच जातात. शाहरुख असो किंवा अमिताभ बच्चन सगळेच बडे स्टार कपिल शर्माच्या शोमध्ये जात आहेत. पण याला अपवाद सलमान खान होणार आहे. 

सलमान खान त्याचा आगामी चित्रपट सुल्तानच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाणार नाही. यामागे कलर्स चॅनल कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. सलमान खान कलर्स चॅनलवर बिग बॉस होस्ट करतो आणि कलर्स चॅनल आणि कपिलमध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. 

कपिल शर्मा जेव्हा कलर्सवर त्याचा शो करत होता, तेव्हा सलमान प्रेम रतन धन पायोच्या प्रमोशनसाठी गेला होता. नुकताच कलर्सचा कॉमेडी नाईट्स लाईव्ह शोचा जज मिका सिंग कपिलच्या शोमध्ये गेला होता आणि त्यानं कपिलचं कौतुक केलं होतं, यामुळेही वाद निर्माण झाला होता. 

कपिलच्या शोमध्ये जाऊन बिग बॉस किंवा कलर्सबरोबर कोणताही वाद होऊ नये म्हणून सलमान कपिलच्या शोमध्ये जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.