मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याला आपल्या आगामी ‘शुद्धी’ या सिनेमासाठी अखेर हिरो मिळालाय... त्याच्या या सिनेमात आता काम करणार आहे... नन अदर दॅन... सलमान खान...
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या करणच्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये सलमान काम करणार असल्याचं खुद्द करणनंच माहिती दिलीय. त्यानं ट्विटर या सोशल वेबसाईटवरून त्याच्या आणि सलमानच्या फॉलोवर्सपर्यंत ही माहिती पोहचवलीय.
‘शुद्धी या सिनेमाचा हिरो असेल सलमान खान... आणि हा सिनेमा 2016 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल’ असं ट्विटरवर करणनं म्हटलंय.
यापूर्वी या सिनेमात ऋतिक रोशन आणि करीना कपूर खान काम करणार होते... पण, तारखा न जुळल्यानं दोघांनीही या सिनेमातून काढता पाय घेतला.... पण, निर्माता करण जोहरला नवा हिरो शोधण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही आणि सलमानवर येऊन त्याची ही शोध मोहीम थंडावली.
‘शुद्धी’ हा करणचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. करणच्या म्हणण्यानुसार, सलमान खानशिवाय ही भूमिका दुसरं कुणीही चांगल्या पद्धतीनं निभावू शकणार नाही.
आता, ‘शुद्धी’चा हिरो सापडलाय पण हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोपडा यांची नाव या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.