माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा सोनम अधिक चांगली - सलमान खान

सुपरस्टार सलमान खानच्या मते 'प्रेम रतन धन पायो'मधील त्याची सहकारी अभिनेत्री सोनम कपूर सौंदर्यात आणि प्रतिभेत माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा उत्तम आहे. मोठ्या पडद्यावर सलमानची जोडी माधुरी दीक्षित, भाग्यश्री, सोनाली बेंद्रे आणि ऐश्वर्या रायसोबत खूप पसंत केली गेली. 

Updated: Nov 5, 2015, 02:08 PM IST
माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा सोनम अधिक चांगली - सलमान खान  title=

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या मते 'प्रेम रतन धन पायो'मधील त्याची सहकारी अभिनेत्री सोनम कपूर सौंदर्यात आणि प्रतिभेत माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा उत्तम आहे. मोठ्या पडद्यावर सलमानची जोडी माधुरी दीक्षित, भाग्यश्री, सोनाली बेंद्रे आणि ऐश्वर्या रायसोबत खूप पसंत केली गेली. 

सलमान खान यापूर्वी सोनमसोबत तिच्या 'सांवरिया' या पहिल्या चित्रपटातही होता. मात्र यावेळी पहिल्यांदा दोघं राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. बजरंगी भाईजानचा सर्वात आवडतं रूप म्हणजे प्रेमच्या भूमिकेत सलमान आपल्याला पुन्हा दिसणार आहे.

आणखी वाचा - व्हिडिओ: 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो रिलीज, सलमान म्हणतो नाक कापू का?

माधुरी आणि ऐश्वर्यासोबतच्या तुलना होते तेव्हा आपल्याला काय वाटतं यावर सोनम म्हणाली, 'मला नाही वाटत की, माझी तुलना त्यांच्यासोबत व्हावी. मी जे केलं त्यात मी उत्तम आहे. पण मला नाही वाटत की, सौंदर्याच्या बाबतीत मी ऐश्वर्या आणि प्रतिभेच्या बाबतीत मी माधुरीच्या जवळपास सुद्धा कुठे आहे.'

सोनम म्हणते, 'मी आपल्या करिअरला सुरूवात केली तेव्हापासूनच माझी तुलना सुरू झाली, कारण मी अनिल कपूरची मुलगी आहे. म्हणून मी फक्त मेहनत करते'. पण यावर सलमान म्हणाला, 'मला वाटतं की, सोनम त्यांच्या इतकीच सुंदर आणि प्रतिभावान आहे... किंवा त्यापेक्षा थोडी अधिक'... 'प्रेम रतन धन पायो' येत्या १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

आणखी वाचा -  'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.